आज सात फेब्रुवारीला सकाळी चार वाजता हजारो राम भक्तांचे आस्था स्पेशल ट्रेनने अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मॉडेल रेल्वे स्थानकावर राम भक्तांनी एकत्रित व्हावे असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले होते आवाहनाला पार्वतीकर नगरीकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला त्यामुळे बुधवारी पहाटे अमरावती रेल्वे स्थानकावर राममय वातावरण निर्मित झाले होते . या वेळी जय श्रीरामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांच्यासह विविध मान्यवरांची गाडीला भगवा झेंडा दाखवीत अयोध्येकडे रवाना केले. अयोध्या कडे जाणाऱ्या या आस्था स्पेशल ट्रेनने बुधवारी हजारो रामभक्त रवाना झाले आहेत. सकाळी पाच वाजता आस्था स्पेशल ट्रेन अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून रवाना झाली त्याकरिता मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सर्व राम भक्त मॉडेल रेल्वे स्थानकावर रात्री नऊ वाजता उपस्थित झाले होते त्या ठिकाणी दहा वाजता अयोध्येला जाणाऱ्या सर्व रामभक्तांना ओळखपत्र वितरित करण्यात आले तदनंतर जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. हा संपूर्ण कार्यक्रम संपल्यावर 7 फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेला रवाना झाली.