गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तो पळून गेला. याप्रकरणी हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.
पोलीस शिपाई निखील अरविंद पासलकर आणि पोपट काळुसिंग खाडे असे निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी निलंबणाचे आदेश काढले आहेत. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी दिल्याप्रकरणी स्वाती हिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानूसार आकुर्डी येथे रहाणाऱ्या मार्शल लिलाकर याला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने इंन्टा खाते उघडून धमकी दिली होती.