जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाच्या कारभाराबद्दलच्या अनेक तक्रारी सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व वित्त व लेखा अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्या माध्यमातून समाजकल्याण विभागातील कामकाजाची सखोल चौकशी केली जाणार आहे. तत्पूर्वी, आंतरजातीय विवाह केलेल्या ५० लाभार्थींना दोनदा अनुदान वाटप झाले कसे, याची चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल सीईओंना सादर झाला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पण, दीडशेहून अधिक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत असतानाही ५० लाभार्थींना या विभागाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान वितरित झाले. सुरवातीला समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी बॅंकेची चूक असल्याचे सांगितले, पण बॅंकेने दोन पानांचा खुलासा देत आमची काहीच चूक नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांमार्फत या प्रकाराची सखोल चौकशी झाली. दोनदा अनुदान वितरित झाले इथपर्यंत ठिक होते, पण ही बाब सहा महिन्यांनी निदर्शनास आली हे गंभीर आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...