नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी अद्याप महिन्याभर शिल्लक आहे, पण जर तुम्ही अजूनही कर व्यवस्था निवडली नाही आणि कंपनीने TDS कापला आहे? नव्या आर्थिक वर्षासाठीक तुम्हाला तुमच्या कर प्रणालीत बदल करायचा असेल, तर आता तुम्हाला संधी आहे. तुम्ही एका कर प्रणालीतून दुसऱ्या कर प्रणालीत स्विच करू शकता. यासाठी करदात्यांना एक फॉर्म भरायचा आहे.
नवीन आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापूर्वी तुमची कराची गणना पूर्ण केली आहे आणि तुम्हाला जुन्या कर प्रणालीतून लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. नव्या आर्थिक वर्षात आयकराच्या जुन्या कर प्रणालीद्वारे ITR दाखल करायचा आहे, अशा करदात्यांना आता अतिरिक्त प्रक्रियेचे पालन करावे लागेल. तुम्हालाही कर सूट मिळवण्यासाठी जुनी कर प्रणाली निवडायची असेल, तर यावेळी विशेष फॉर्म भरावा लागेल. तुम्ही कितीही कागदपत्रे सादर केली तरी हा फॉर्म न भरल्यास एका पैशाचीही करमाफी दिली जाणार नाही.
गेल्या वर्षांपासून केंद्र सरकारने नवीन कर प्रणाली डीफॉल्ट लागू केली आहे. यापूर्वी जुनी कर प्रणाली डीफॉल्ट होती, परंतु मागील वर्षी अर्थसंकल्प २०२३ मध्ये नवीन कर प्रणालीमध्ये सर्व सुविधा प्रदान करून सरकारने डीफॉल्ट लागू केली. म्हणजे जर तुम्ही तुमच्या बाजूने कोणतीही कर प्रणाली निवडली नाही तर नवी कर प्रणाली डीफॉल्ट लागू होईल आणि त्याच आधारावर कर देखील मोजला जाईल.
नवीनमधून जुन्या कर प्रणालीत स्विच कसे करायचे
आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी नवीन फॉर्म जारी केले. जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी जुनी कर व्यवस्था निवडणार असाल, तर आता फॉर्म 10-IEA भरणे आवश्यक असेल. जर तुम्ही हा फॉर्म भरना नाही तर तुमचा ITR जुन्या पद्धतीवर स्विच होणार नाही. सरकारने २०२० अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली लागू केली होती जी गेल्या वर्षांपासून डीफॉल्ट करण्यात आली.
फॉर्म 10-IEA बद्दल जाणून घ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२० मध्ये नवीन कर व्यवस्था सादर केली होती. तर नुकत्याच जारी केलेल्या कर रिटर्न फॉर्ममध्ये ‘जुनी कर व्यवस्था’ निवडावी लागेल आणि नवीन कर प्रणालीमधून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीला स्वतंत्र फॉर्म भरावा लागेल. असे न केल्यास करदात्यांच्या कराची गणना नव्या कर प्रणालीनुसारच केली जाईल.
नव्या फॉर्ममध्ये अतिरिक्त माहीत द्यायची
दरम्यान, जुन्या कर प्रणालीत ITR भरण्यासाठी करदात्यांना नव्या 10-IEA फॉर्ममध्ये विविध माहिती भरावी लागेल – कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन क्रमांक), कर स्थिती (वैयक्तिक, HUF, रहिवासी इत्यादी) आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) साठी कोणत्याही कर लाभांचा दावा केला जात आहे की नाही यासारखे तपशील प्रविष्ट करावे लागतील.
याशिवाय फॉर्ममध्ये तुमच्या दोन्ही कर प्रणालीच्या बदल आणि बाहेर जाण्याच्या इतिहासाबद्दल देखील विचारले जाईल. लक्षात ठेवा की तुम्ही हा फॉर्म कर भरण्याच्या अंतिम मुदत म्हणजे ३१ जुलैपूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे कारण करदाते ३१ डिसेंबरपर्यंत विलंबित रिटर्न भरू शकता. परंतु ३१ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत फॉर्म भरला नाही, तर जुन्या प्रणालीमध्ये कर भरू शकणार नाही कारण फॉर्म 10-IEA सबमिट करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.