चार चाकी गाडीचे ठरलेल्या सौद्यानुसार पैसे न देता गाडी स्वतःकडेच ठेवून दमदाटी केल्याबद्दल सत्ताधारी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख व त्यांचे सहकारी अशा दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल दत्तात्रेय मुनगापाटील राहणार सृष्टी नगर अक्कलकोट रोड यांनी या प्रकरणी फिर्यादी दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे जुने चारचाकी गाडी विक्री करण्याचा व्यवसाय आहे.
फिर्यादी हे पुणे मुंबई येथून चारचाकी विकत गाडी आणून सोलापूर शहरात विकत असत दि ०४/०१/२०२४ रोजी ते आजतागायत पर्यत फिर्यादीचे राहते घरी सृष्टी नगर अ.कोट रोड सोलापूर येथे यातील फिर्यादीचे ओळखीचे आरोपी आकाश मुदगल यांनी फिर्यादीस त्या जिल्हाप्रमुख यांना चारचाकी गाडी घ्यावयाची आहे असे सांगितल्यावर फिर्यादीने त्यांच्या जवळील चारचाकी गाडी क्र एमएच ०४ एफ एन ७८७८ हे वाहन यातील दोन्ही आरोपीना फिर्यादीचे घरी दाखविले तेव्हा त्या जिल्हाप्रमुख यांनी सदर गाडी पसंद आहे असे म्हणून ४ लाख रूपयेला गाडीचा सौदा झाल्यानंतर जिल्हाप्रमुख यांने सदर ठरलेल्या सौदयापैकी एक लाख रूपये हे अॅडव्हान्स म्हणून दिले उरलेले पैसे दोन दिवसात देतो असे म्हणनू फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेवून व ते वाहन स्वतःचे म्हणून वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणुक करून दमदाटी केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत.