महापालिकेवर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, भाजपही पाच वर्षे सत्तेत राहिला. पण, सोलापूरकरांना नियमित पाणी मिळाले नाही. सध्या चार दिवसाआड पाणी असून साधारणत: १० मेपासून त्यात एक दिवसाची वाढ होण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने या काळात पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.सोलापूर शहराजवळील हद्दवाढ भाग १९९२ रोजी महापालिकेत समाविष्ट झाला, पण अजूनही तेथील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. आता समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटीतून सुरू आहे, पण काम पूर्ण झाल्यानंतरही शहरांतर्गत जलवाहिनी व्यवस्था सुधारावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून लोकसभेवेळी शहरातील पाणी, बेरोजगारी, तरुणांचे स्थलांतर असे मुद्दे प्रचारात आणले जातील. त्यामुळे सत्ताधारी आमदारांकडून शहराच्या पाणीपुरवठ्यावर दररोज लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे.पण, ‘सोलापूरला नियमित पाणी आम्हीच देवू’ अशी खात्री भाजपचे आमदार देत आहेत. ‘सत्ताधाऱ्यांनी विमानसेवा दोन महिन्यात सुरू होणार होती, त्याचे काय झाले’ असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता निवडणुकीत सोलापूरचा पाणीप्रश्न पेटणार हे निश्चित मानले जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...