रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर हे दु:खी असून महायुतीच्या बैठकांना पदाधिकाऱ्यांनी हजर राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ते अन्य पक्षाबरोबर जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, महादेव जानकर हे महायुतीबरोबर असून मी छाती ठोकपणे सांगतो की, ते कुठेच जाणार नाही.
देवेंद्र फडणवीस हे त्यांचे परममित्र आहेत. तर पंकजा ताई या त्यांच्या बहीण आहेत. त्यामुळे हे दोघेही महादेव जानकर यांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी समर्थ आहेत. माझे एकदा समाधान होऊ द्या आणि मग मला बैठकीला बोलवा. अशी भूमिका त्यांनी (महादेव जानकर) मांडली आहे. त्यांचे हे म्हणणे ठीक आहे. ते कुठेही गेले नाही आणि जाणार देखील नाही, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.