पुणे दहशतवाद प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. दोन्ही राज्यांत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पुण्यात रचला गेला. पुण्यातील कोंढवा भागात राहत असलेल्या एका घरात बॉम्ब तयार करण्याचे दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले होते. मागील वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.एनआयएने इसिस विरोधात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले, आणखी चार आरोपींची नावे दिली आणि एकावर आरोप जोडले. मोहम्मद शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशी चार आरोपींची नावे आहेत.
मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतदादांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. पुणे आणि महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व सामील होते.