मालेगाव येथील मुख्य चौकात मागील अनेक दिवसापासून नालीचे, गटाराचे घाण पाणी साचले आहे. त्यामुळे येथील व्यापारी, शालेय विद्यार्थी, वाहन चालक, ग्रामस्थ यांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या भेडसावत असून याचा नाहक-त्रासही सहन करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच यांनी तात्काळ लक्ष घालून सदर प्रश्न मार्गी काढवा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
मालेगाव ता. अर्धापूर ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व बाजारपेठ आहे या ठिकाणी सर्व शैक्षणिक संस्था बँका व्यापारी असल्याने या ठिकाणी परिसरातील 15 ते 20 गावाचा संपर्क आहे. परंतु येथील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मालेगाव-नांदेड या मुख्य रस्त्यावर गटाराचे, नालीचे घाण पाणी मागील अनेक दिवसापासून साचल्याने येथील व्यापारी, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, वाहन चालक, प्रवासी यांना दुर्गंधीचा नाहक-त्रास सहन करावा लागत आहे. सोबतच आरोग्याचा प्रश्नही भेडसावत आहे. घाण पाण्यामुळे मालेगाव येथील संपूर्ण व्यापारी गाळेधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थ करत आहेत.
प्रतिक्रिया –
अनेक दिवसापासून नाली व गटाररीचे घाण पाणी मुख्य चौकात साचत आहे. त्याचा ग्रामपंचायततिने तात्काळ उपायोजना करावी, अन्यथा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयावर आंदोलन करणार आहोत.
उद्धव कदम, सामाजिक कार्यकर्ते
ग्रामपंचायत व्यापारीगाळे धारकाकडून लाखो रुपयाचे डिपॉझिट किराया घेतला जातो, ग्रामस्थांकडून कर वसुली केली जाते. परंतु सुविधा दिल्या जात नाहीत. येथील मुख्य चौकात अनेक दिवसापासून नालीचे घाण पाणी साचत आहे त्यामुळे दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत या संदर्भात वारंवार ग्रामपंचायतीला सूचना करून, वृत्तपत्रात बातम्या देऊनही ग्रामपंचायत जाग येत नाही. तात्काळ प्रश्न मार्गी लावावा