लोकशाहीच्या सर्वात मोठ्या निवडणुकीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी देशांतील सर्व नागरिकांना सहभागी होता यावे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी ७ मे रोजी मतदानादिवशी सार्वत्रिक सुट्टी असणार आहे. त्यातील तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा सहभाग आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनातर्फे ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी लोकसभा मतदारसंघ ४२- सोलापूर व ४३- माढा या क्षेत्रांतील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाबाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील.
हिंदुस्थान समाचार