डारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा जिल्ह्यातील जैतपुर गाव दत्तक घेतला होता. पण आज या गावाचा विकास झाला नाही.
देशात 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झालं व केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाली. तेव्हा पासून आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेण्याची परंपरा सुरू झाली. भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार सुनील मेंढे यांनी लाखांदूर तालुक्यातील जैतपुर गाव दत्तक घेतले. स्थानीय विकास निधीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होणार होता अशी आश्वासन खासदार महोदयांनी गावकऱ्यांना दिली. पण गाव दत्तक फक्त कागदावर घेतला. प्रत्यक्षात खासदार साहेब गावात कधी फिरकलेच नाही. आता गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पाणी पुरवठा योजना आहे. पण गावकऱ्यांना पिण्याच पाणी मिळत नाही. गावात 2019 पुर्वी ज्या समस्या आहेत. त्याच समस्या आजही कायम आहेत असे गावकरी सांगत आहेत.