जिल्ह्यात अवकाळीच्या तडाखाने द्राक्ष, आंबा, कलिंगड, खरबूज या फळपिकांना फटका बसत आहे. आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसात जिल्ह्यातील १ हजार ३४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या नुकसान पाहणीत समोर आली आहे. नुकसानीची अंतिम आकडेवारी सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा पंढरपूर तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील १ हजार १५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल माढा तालुक्यातील ११९ हेक्टरचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील ४ हेक्टर, करमाळा तालुक्यातील २० हेक्टर, माळशिरस तालुक्यातील ३८ हेक्टर व मंगळवेढा तालुक्यातील १० हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसल्याचे कृषी विभागाच्या नगर अंदाज पाहणीत समोर आले आहे.