सोलापूर : 2014 साली जनतेला 15 लाखाचे आमिष दाखविले म्हणून लोकांनी मतदान केले, तो खासदार निष्क्रिय ठरला, 2019 साली उमेदवार बदलला, त्यालाही जनतेने भरभरून मतदान केले, सत्ता असताना, निधी असताना ही आता पुन्हा तिसरा अन् उपरा उमेदवार तुम्ही देत आहात यावरून तुमचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा दाखला मिळतो. अशी टीका करत भाजपमुळे या दहा वर्षात सोलापूर 25 वर्षे मागे गेले आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास सोलापूरची लेक या नात्याने संसदेत आवाज उठवणार अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, महेश कोठे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, एम पाटील, पुरुषोत्तम बरडे, अस्मिता गायकवाड, यू एन बेरिया, अमर पाटील, शरद कोळी, आबुतालीम डोंगरे, गणेश वानकर, अशोक निंबर्गी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.