लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्जाची छाननी शनिवार 20 एप्रिल रोजी करण्यात आली. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अर्जावर भारत कंदकुरे सचिन मस्के आतिश बनसोडे यांनी हरकत घेतली आहे तर भारत कंदपुरे आणि प्रमोद गायकवाड यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे.
अपक्ष उमेदवार भारत कंदकुरे यांनी राम सातपुते यांच्यावर हरकत घेत सातपुते यांचा जात वैधता प्रमाणपत्र हे 2012 सालचे आहे परंतु त्यांचे इंजिनियर शिक्षण हे 2015 मध्ये पूर्ण झाले, 2013 ला त्यांनी गाडया खरेदी केल्या, ऊसतोड कामगाराच्या मुलाकडे एवढ्या गाड्या असतात का? पत्नीच्या नावाने शपथ पत्रात pan card नाही असे दाखवले आहे, मग तिच्या नावाने गाड्या कशा काय? अशी हरकत असून प्रणिती शिंदे यांनी आजपर्यंतच्या निवडणुका या सर्वसाधारण प्रवर्गातून लढवल्या, मग त्यांना जातीचा दाखला कोण दिला ही हरकत आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी राम सातपुते यांचा जातीचा दाखला बनावट असून उमेदवारी अर्ज सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली सादर केली आहे.
अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या अर्जावर हरकत घेत शिंदे यांनी M 3 गुन्ह्यांमध्ये दाखल असलेले कलम प्रतिज्ञा पत्रात लपविले आहे. अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांनी प्रणिती शिंदे यांच्या वर हरकत घेत शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खोटी असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर या हरकतीवर सुनावणी चालू आहे. सर्व सुनावणीवर वकिलांचां युक्तिवाद झाल्यानंतर कुमार आशीर्वाद हे निर्णय देणार आहेत.