दि.२१मे रोजी साडेतीनच्या दरम्यान स.पो.नि दिलीप ढेरे त्यांच्या पथकासह बार्शी शहरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम लातुर रोड येथे संशयास्पद स्थितीत फिरत असुन त्याच्या कमरेला पिस्टल आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस स्टाफ लातुर रोड झाडबुके कॉलेज समोर आलो. तेथे एक इसम संशयीत रित्या थांबलेला दिसुन आला.
पोलीसांना पाहताच तेथुन पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांस टी. व्ही. एस शोरूम समोर रोडवर पकडले पकडलेल्या इसमांस विश्वसात घेवुन त्यांचे नाव विचारता त्यांने त्यांचे नाव १) आकाश सुभाष गाडे वय २७ वर्षे रा. ब्रम्हा शेजारील गल्ली राम मंदीराजवळ रामनगर सिंहगड रोड पुणे मुळ गाव कापुरहोळ ता. भोर जि. पुणे सध्या रा. माणकेश्वर ता. भुम जि.धाराशिव असे असल्याचे सांगितले. आकाश सुभाष गाडे याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल व धातुचे दोन राउंड तसेच एक नोकीया कपंनीचा काळया रंगाचा मोबाईल असा एकुण १५,१००/- रू मुददेमालासह मिळून आला. म्हणुन त्याचे विरूध्द पोकॉ अंकुश एकनाथ जाधव यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिल्याने बार्शी शहर पोलीस ठाणेस भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३,२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आले आहे.
सदर गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरूध्द सिंहगड रोड पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस ठाणेस गंभीर स्वरूपाचे शरीराविषयी गुन्हे दाखल असुन सदर आरोपीस मोक्का कायदेअंतर्गत कारवाई करण्यात आली असुन तो सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या ठिकाणाहुन ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. आरोपी यांचेकडे गुन्हयातील रिव्हॉल्वर तसेच गुन्हयाचे नक्की कारण काय आहे ? व त्याचे इतर साथीदार यांचेबाबत चौकशी चालु आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, यांचे मार्गदर्शनाखाली . जालींदर नालकुल उप विभागिय पोलीस बार्शी विभाग, पोलीस निरीक्षक आण्णसाहेब मांजरे बार्शी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि/दिलीप ढेरे पोहेकॉ/ दबडे पोना/पायघन पोकों/ जाधव पोकॉ/भांगे पोकॉ/अकुलवार पोकॉ/ नितनात पोकॉ/ फत्तेपुरे पोकॉ/ उदार पोकॉ/बागल पोकॉ देशमुख पोकॉ/ पवार सर्व ने. बार्शी शहर पोलीस ठाणे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोकों/व्यंकटेश मोरे व रतन जाधव यांनी केली असून त्याबाबत पुढील तपास श सपोनि /दिलीप ढेरे बार्शी शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.