चार बुरखाधारी महिलांनी शहरातील दोन सोन्याच्या दुकानांमध्ये जाऊन हातचलाखी करत १८.७५ ग्रॅम दागिन्यांची चोरी केली. त्याची किंमत एक लाख ३१ हजार रुपये आहे. याघटना सिद्धेश्वर पेठेतील आरमान ज्वेलर्स आणि अशोक चौकातील राजेश ज्वेलर्स येथे घडल्या. दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे. या घटनांप्रकरणी फौजदार चावडी आणि जेलरोड पोलिस ठाण्यात चार अज्ञात बुरखाधारी महिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चोरीच्या पहिल्या घटनेमध्ये आसिफ बशीर शेख (वय ३८, रा. हाजी हजरत चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्या दिली आहे. त्यानुसार त्यांच्या आरमान ज्वेलर्स या दुकानात १५ मे रोजी चार बुरखाधारी महिला दाखल झाल्या होत्या. त्या चार महिलांनी मिळून हातचलाखीने १० ग्रम सोन्याची नाकातील दागिने पळवले. ७२ हजार रुपयांचा तो ऐवज होता. दरम्यान चोरीच्या दुसऱ्या घटनेप्रकरणी राजेश अंबादास पेंडम (वय ३०, रा. साईबाबा चौक, न्यू पाच्छा पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चोरीची घटना २४ मे रोजी दुपारी साडे चार ते साडे पाच या दरम्यान घडली. राजेश ज्वेलर्स या दुकानामध्ये चार अज्ञात बुरखाधारी महिला आल्या होत्या. त्या महिलांनी फिर्यादी आणि फिर्यादीचे वडील यांचे लक्ष विचलित केले. हातचलाखी करून करत सात ग्रॅम सोन्याचे पत्ता आणि मणी, ७५० मिली ग्रॅम सोन्याचे बदाम, १ ग्रॅम सोन्याची कडी आदी सुमारे ५९ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.