लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेतही महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून विधानसभेची निवडणुक लढवणार आहेत. पण विधानसभेच्या जागांसाठी पडद्यामागून आता यंत्रणा कामाला लागले असे चित्र समोर येते. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी २८८ मतदारसंघाचा आढावा घेत, जागावाटपाची चाचपणी सुरु केली असे म्हणे काही वावगे ठरणार नाही.
लोकसभेत महाविकास आघाडीत काही जागांवरुन वाद झाल्याचे पाहायला मिळाले आणि काही ठिकाणी ठाकरे गटाला जागावाटपाच्या काही चुकींच्या निर्णयामुळे फटका बसल्याचे सुद्धा चित्र दिसते. अशातच आता विधानसभेत चुकीची पुनरावृत्ती होवू नये म्हणून लोकसभा निकालाच्या आठ दिवसानंतरच ठाकरेंनी विधानसभेची चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच सेनेचे काही ठरलेले मतदारसंघ आहेत. आता लोकसभेप्रमाणे यंदा गोंधळ होवू नये यासाठी ठाकरेंनी आधीच सावध पावले उचलायला सुरुवात केली असे दिसत आहे.
सगळ्याच राजकीय पक्षाने आता लोकसभेचा निकालावरुन विधानसभेसाठी आखणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा तब्बल आठ दिवसात विधानसभेसाठी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. बैठकी दरम्यान ठाकरेंनी विभागनिहाय सगळ्याच मतदारसंघातील आढावा घेतल्याचे समजते. सेनेच्या संपर्क प्रमुखांना ठाकरेंनी संघाटनात्मक बांधणी वर भर देण्याचा आदेश दिला आहे. लोकसभेच्या निकाल आणि मागील विधानसभेत मिळालेला मताधिक्यावर सुद्धा लक्ष ठेवा असे ठाकरे म्हणालेत.