अहमदनगर, 22 जून (हिं.स.):- शाळा,अभ्यास,क्लास या बरोबरच शरीर तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ आवश्यक आहे.त्यामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढण्याबरोबरच बौद्धीक क्षमततेही वाढ होते.त्यामुळे प्रत्येक मुला-मुलींनी मैदानी खेळ खेळले पाहिजे.कराटे हा आत्मसंरक्षणासाठी महत्वाचा प्रकार आहे.कराटे खेळा मुळे आपल्यातील क्षमता वाढीस लागली जाते.आज या खेळाडूंनी कठोर परिश्रम करुन विविध बेल्ट प्राप्त केले आहे.हे खेळाडू पुढील स्पर्धेसाठी पुर्णपणे तयार झाले असल्याचे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.
वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने नगर येथे विविध बेल्ट परिक्षा संपन्न झाली.या परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत मुख्य प्रशिक्षक हारुण शेख,प्रशिक्षक रमजान शेख,तन्वीर खान,बिलाल शेख,महेक शेख, स्वराज नारायण, शौर्य बल्लाळ,आहना भंडारी,विधी गुंदेचा,सायली सुपेकर,दिपाली भालेराव आदि उपस्थित होते.यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे यलो बेल्ट – सन्मीत गांधी,अनन्या कासलिवाल.ऑरेंज बेल्ट – दिशा पितळे,कैवल्या नरवडे,सोनाक्षी पितळे,संचित कुलट,सुजितकुलट. ग्रीन बेल्ट – हर्षवर्धन मोढवे,अरुण डांगे,दृष्टी दुर्गुळे. ब्ल्यू बेल्ट – शर्वरी काकडे. पर्पल बेल्ट – कस्तुरी नरवडे. गोल्डन ब्राऊन बेल्ट – ज्ञानेशा दरवडे. ब्लॅक बेल्ट – ओंकार निमसे,बुर्हा न्नुद्दीन हकिमजीवाला. ब्लॅक बेल्ट डिन – ईशान होशिंग.यावेळी खेळाडूंनी प्रात्यक्षिकातून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.तन्वीर खान यांनी या विविध बेल्टचे महत्व विषद केले.रमजान शेख यांनी आभार मानले.