८ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य शांतता रॅली
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे होत असलेल्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उमरी तालुक्यातून हजारो मराठा बांधव जाणार आहेत . या रॅलीमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने मराठा सेवक तरुणांची फळी निर्माण करण्यात आली असून या तरुणांना टी-शर्ट चे वाटप रविवारी दुपारी करण्यात आले. सर्व तरुणांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सर्वांनी आपापल्या गावातून अत्यंत शिस्तीने निघायचे आहे. रस्त्यामध्ये फराळ, जेवण, पाणी, नाश्ता अशी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. उमरी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावातून जास्तीत जास्त मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी व्हावे. या दृष्टीने जनजागृती करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणाची ही लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली असून विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच मराठा आरक्षणाचे काम फत्ते होऊ शकते.
अन्यथा यात दिरंगाई झाल्यास महाराष्ट्र शासन आरक्षणाचा प्रश्न पुन्हा लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सकल मराठा समाज बांधवांनी एकजुटीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणे आवश्यक झालेले आहे.