बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
वाशी येथील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी आपले फॉर्म अध्यावत करून दाखल करण्यासाठी वाशी येथील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी गावातील सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळावा तसेच महिलांना इतर अनेक ठिकाणी फिरावे लागू नये व त्यांचे कष्ट वाचावे म्हणून कवडे यांनी वाशी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात तीन दिवशीय कॅम्पस ठेवलेला आहे.
आज दि.१३ रोजी प्रथम दिवस असल्याने महिलांची मोठी गर्दी दिसून आली.
सदरील कॅम्पमध्ये कागदपत्राची योग्य तपासणी करून फॉर्म पूर्ण भरून त्यांना पोजपावती देण्यात येत आहे त्यामुळे महिलांना काही त्रास न होता सहजपणे फॉर्म दाखल केला जात आहे त्यामुळे महिला वर्गातून त्यांना धन्यवाद दिले जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सहकार्य करण्यासाठी वाशी नगरपंचायत चे उपनगर अध्यक्ष सुरेश बप्पा कवडे भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा त्रिशाला देशमुख नगरपंचायत चे नगरसेवक राजू भैया कवडे, बळवंत कवडे, नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड, संतोष कवडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नानासाहेब कवडे, प्रशांतराव गायकवाड, नगरसेविका स्मिता गायकवाड नगरपंचायत चे सर्व कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्त्या तहसीलचे कर्मचारी तसेच भाजपाचे व सुरेश बप्पा कवडे मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होते.