उपोषणास बसताच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु होणार,बांधकाम अभियंता एस.एस. घुले यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
भोकरदन : सन 2021 साली मंजुर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे व रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेतारुग्णवाहिकेंच्या संख्येत वाढ करणे या प्रमुख मांगण्यांसाठी स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख विकास जाधव, प्रहार संघटनेचे ता.अध्यक्ष नारायण मिसाळ यांनी उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसले होते.
दरम्यान उपोषणास विविध सामाजिक संघटना आणि विविध पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दिला.उपोषणास मिळणारा पाठिंबा बघुन उपविभागीय कार्यालयाने बांधकाम विभागास तातडीने या उपोषणाची माहिती दिली दरम्यान बांधकाम विभागाचे अभियंता एन.एस.घुले यांनी उपोषणस्थळी भेट दिली व ऑगस्ट पहिल्या आठवड्यात संबंधीत उपजिल्हारुग्णालयाचे बांधकाम सुरु होईल असे लेखी पत्र दिले व उपोषण सोडण्याची विनंती केली.
त्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषणकर्ते विकास जाधव व नारायण मिसाळ यांनी 15 आॅगष्टपर्यंत उपोषण स्थगीत केले.उपोषणास छावा संघटना, शेतकरी संघटना,बळीराजा फाउंडेशन,एमआयएम पक्ष,आम आदमी पक्षासहविविध सामाजिक संघटनेसोबतच विविध राजकीय व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत पाठिंबा दिला.



















