*हजारो भाविकांच्या उपस्थितीत अरिहंतनगर जैन मंदिर विरागसिन्धु सभागृह येथे चातुर्मास कळस स्थापना समारोह उत्साहात संपन्न*
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी –
श्री.१००८ युग प्रवर्तक आदिनाथ दिगंबर जैन मंदिर अरिहंतनगर येथे समाधिस्त गणाचार्य विरागसागरजी महाराज यांच्या संघातील मुनिश्री विहीतसागरजी महाराज यांच्या सह २१ साधु संतांचे चातुर्मास निमीत्त वास्तव्य असुन त्यांच्या सानिध्यात दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ६.३० वा. अरिहंतनगर जैन मंदिरात आचार्य परमेष्ठी विधानाचे आयोजन करण्यात आले होते. तदनंतर अरिहंतनगर जैन मंदिरापासुन ते मित्रनगर गार्डन पर्यंत चातुर्मास कळसाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. दुपारी १ ते ५ वाजे पर्यंत भव्य चातुर्मास कळस स्थापनेचे व गुरु पौर्णीमाचे आयोजन करण्यात होते.
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने करण्यात आली. यावेळी आचार्य विरागसागरजी महाराज यांचे अंतिम क्षण व्हिडीओ व ऑडीओ मार्फत दाखविण्यात आले. यानंतर अरिहंतनगर येथील नवयुवतींनी धार्मिक नृत्य सादर केले. तसेच शहरातील विविध मंडळाच्या वतीने गुरुदेवांची अष्टद्रव्याने पुजा करण्यात आली. तसेच महिला मंडळाच्या वतीने गुरुदेवांवर झाकीया प्रस्तुत करण्यात आली.
यावेळी धर्मध्वजारोहन मंदाबाई शामलाल प्रशांत सचिन पांडे परिवार, श्री.संतोष सौ.सुनिता शृति सौरभ अनंत भाग्य अजमेरा परिवाराच्या वतीने करण्यात आले तर मंडप उदघाटन श्रीपाल शुभम अभिषेक यश पांडे परिवाराच्या वतीने करण्यात आले.
यावेळी उपस्थित हजारो भाविकांना ताराचंद संजय प्रमोद मनिष पांडे परिवार यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी अतिथीच्या वतीने सभेचे दिप प्रज्वलन करुन कार्यकमाची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी मुनिश्री विहीतसागरजी महाराज ससंघाच्या चातुर्मास कळसाची स्थापना करण्यात आली यावेळी मुख्य कळस विरागसिंधु कळसाचा मान सुनिल सुंदरलालजी पाटणी परिवार अंधारीवाला यांना मिळाला तर भगवान आदीनाथ कळस संतोष अजमेरा अरिहंत नगर जैन मंदिर अध्यक्ष यांना मिळाला. तसेच भगवान महावीर कळस राजस्थान येथील भक्ताला मिळाला. यावेळी कार्यक्रमासाठी पालकमंत्री खासदार संदिपान भुमरे, उपमहापौर राजु शिंदे, दामुअण्णा शिंदे,आदीं सह अनेक मान्यवाराची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मा.संदिपानजी भुमरे यांनी सांगीतले की, आचार्य विरागसारजी महाराज यांचे समाधीस्थळ सुशोभीत करण्यासाठी जे काही सहकार्य निधी लागेल त्यासाठी मी पूर्ण मदत करेल असेही सांगीतले.
यावेळी मुनिश्री गणधर मुनि विवर्धन सागरजी महाराज यांनी भाविकांसमोर उदबोधन करतांना सांगीतले की, संसारामध्ये गुरूचे महत्व विशेष आहे. केवळ गुरु शब्द उच्चारल्यास आपल्या डोळयांपुढे अशा व्यक्तीची प्रतिमा निर्माण होते की, जी सर्वश्रेष्ठ आहे. या गुरु शब्दात संपुर्ण ब्रम्हांडापेक्षाही जास्त शक्ती दडलेली आहे. कारण आत्म्यांचे अनंत ज्ञान व शक्तीच्या भंडाराचा साक्षात्कार गुरू शिवाय तिन्ही काळात शक्य नाही. तसे पाहिले तर वर्तमानात चालते फिरते ज्ञानाचे भंडार ईश्श्वराचे रूप आहे.
पुढे त्यांनी सांगीतले की, गुरु शिवाय जीवन मीठ नसलेल्या भाकरीसमान आहे. महापुरâषांच्या हजारो वर्षानंतर त्यांनी सांगीतलेल्या अनुपम अथवा प्रशस्त मार्ग जो आपल्याला मिळत आहे ते सर्व गुरâंच्या कृपेमुळे. याचे संपुर्ण श्रेय गुरâ भगवंतानाच जाते. हि सर्वोत्त्तम संपत्ती आपल्याला गुरâपासुनच मिळालेली आहे. जे धन,शक्ती,सत्त्ता आदींमध्ये शक्य नाही. त्यासाठी संत समागमच उपाय आहे. भारत एक महान देश आहे व त्यातील नागरीक अत्यंत भाग्यवान आहेत. ज्यांना संताची शिकवण त्यांच्या बालपणीच मिळाली आहे. संत शक्तीचा निर्माण बाहय शक्ती व बाहेरील वस्तुंमुळे शक्य नाही. अध्यात्मिक शक्ती व आचार विचारामुळे या देशाला जगदगुरâ बनण्याचे सौभाग्य मिळाले आहे असे विचार मुनिश्री विवर्धन सागरजी यांनी मांडले. चातुर्मास कलश स्थापने चे महत्व श्रमण आर्यिका विश्वास श्री माताजी स्पष्ट केले।
या कार्यक्रमासाठी अरिहंतनगर, बालाजीनगर, सिडको, हडको, मोहनलालनगर, रामनगर, चिंतामणी कॉलनी, जवाहर कॉलनी, सेप्रâॉन, राजाबजार, यांच्यासह लासुर,वेरुळ,कचनेर,पैठण,देवगांव रंगानी, नाशिक,मालेगांव,राजस्थान आदी ठिकाणाहुन हजारो भक्त उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणाचार्य विरागसागरजी गुरुदेव वर्षायोग समिति 2024, श्री आदीनाथ दिगंबर जैन मंदिर विश्वस्थ आणि, महिला मंडळ, यांनी विशेष परिश्रम घेतले.



















