देगलूर :
देगलूर शहरातील एका जवळीक नातेवाईकाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या मुखेड येथील एका कंत्राटदाराच्या कारचे काच फोडून १४ लाख रु. असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरात घडली. भर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली चोरी नेमक कशी झाली? असे अनेक प्रश्नांने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुखेड येथील कंत्राटदार असलेले हणमंत जयवंतराव इंगोले (रा. बेरळी बु. ता. मुखेड) हे शुक्रवारी सकाळी मुखेड येथील एका बँकेतून १४ लाख रुपये गाडी क्रमांक एम. एच. २६ ए. के. ११६७ ने ते नांदेडला जाणार होते. मात्र, देगलूर येथील त्यांच्या नातलगांच्या घराची वास्तुशांती असल्यामुळे ते देगलूरला आले. दुपारी अंदाजे 02:50 वाजताच्या दरम्यान ते देगलूर शहरातील रामपूर रोड लगत असलेल्या सावित्रीबाई फुले शाळेसमोर कार उभी केली. पैशांची बॅग कारमध्येच ठेवून ते नातेवाईकांना भेटून पंधरा मिनिटांत परत आल्यानंतर त्यांच्या कारची काच फोडून डिक्कीमध्ये ठेवलेली १४ लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानूसार देगलूर पोलीस स्टेशन येथे हणमंत इंगोले यांच्या फिर्यादी नुसार फिर्याद घेण्यात आली पुढील तपास पोलीस उपनरीक्षक नरहरी फड करीत आहेत.
आरोपींच्या शोधात पथक रवाना
■ सदरील चोरी प्रकरणात चोरट्यांकडून मुखेड येथून रेकी करण्यात आल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे देगलूर पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी मुखेड येथे रवाना झाले तर नाकाबंदी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.