तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदारांना येणाऱ्या विविध अडचणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांना ग्रामीण पाणी पुरवठा कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड, अभिमन्यू पवार व राहुल कौलगे यांनी दिले.
निवीदा चौकशीतील कामाची देयके त्वरीत अदा करा, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची निवीदा चौकशीच्या नावाखाली एकुण १८९ पैकी ९५ कामांची देयके मार्च २०२३ पासुन प्रलंबित आहे. यामधील १६ कामांची चौकशी गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगून ही कामे बंद करण्यासाठी तोंडी सांगितले. त्यामुळे ९५ कामे आर्थिक अडचणीमुळे सध्या बंद स्थितीत
आहेत.
आठ दिवसात शासनाकडून परवानगी आल्यानंतरच आपली देयके अदा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापर्यंत देयके देण्यात आली नाहीत. शासनाकडे पाठविलेले १२ कामाच्या फाईल्स अद्यापपर्यंत विभागाकडे मागवून घेण्यात आले नाही. त्यामुळे ९५ कामापैकी चौकशीतून बाहेर निघाल्याने अनेक कामांची देयके देता आले नाहीत.
तसेच चौकशीमधील सर्व कामांना देयके अदा देण्याबाबत शासनाकडून परवानगी दिली नाही. यासह जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या सर्व कामांना विना दंडाने मुदत वाढ देणे व ज्या कामांना दंड झाला आहे , त्यांचा दंड माफ करावे, ज्यादा दराच्या निवीदेंना शासन स्तरावरून त्वरीत मान्यता देण्यात यावे, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे करताना अचानकपणे पाईपच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने शासनाकडून जादा दराने निविदा मंजूर करून कार्यरंभ आदेश विभागामार्फत देण्यात आले. त्यापैकी अनेक कामे पूर्ण झाली आहेत. सदरचे प्रस्ताव शासनाकडे कार्योत्तर मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आजतागायत सदर जादा दराची निविदेला मंजूरी मिळाले नाही. तसेच झालेल्या कामाची देयके तयार करणेस संबंधितांकडून विलंब होत आहे. म्हणून शासनाने कान्र्टॅक्टरच्या अडचणींची माहीती घेऊन जलजीवनची बिले त्वरीत अदा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कॉन्र्टॅक्टरांची अवस्था दयनीय
जलजीवन मिशनची कामे करून वर्षे होउन गेली, तरी शासनाकडून अद्याप बिल मिळाले नाही. काम करताना मोठ्या प्रमाणात स्वताकडील रक्कम गुंतवणूक केल्याने व वेळेवर बिल मिळत नसल्याने कॉन्र्टॅक्टर आर्थिक संकटात सापडले आहेत. म्हणून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
मोतीलाल राठोड, अध्यक्ष, ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्र्टॅक्टर असोसिएशन