तभा फ्लॅश न्यूज/ जमीर काझी : सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप – प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे पावसाळी अधिवेशन गाजत असताना बुधवारमात्र त्याला काहीसा अपवाद ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुसंवाद करीत एकमेकांना हलकेफुलके टोलेही लगाविले. इतकेच नव्हे तर फडणवीस यांनी ठाकरे यांना आपल्याकडे येण्याची चक्क ऑफर दिली.
त्यासाठी निमित्त होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाची. विधानपरिषदेतील भाषणात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’2029 पर्यंत आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा स्कोप नाही. तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे, अशी खुली ऑफर दिली.त्यापूर्वी विधान भवनाच्या दालनात दोघांच्यात समोरासमोर आल्यानंतर थोडावेळ चर्चा झाली. त्यामुळे त्यांचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला. त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्याने विधीमंडळच्यावतीने निरोप देण्यात आला. यावेळी चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत अंबादास दानवे यांना निरोप देताना भाषणांमध्ये चांगली टोलेबाजी रंगली. यावेळी फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचचे नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलूया, असे सांगून ते म्हणाले, “अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे.
अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. भोंग्याविरोधात त्यांनी अनेक निवेदनं दिली. ते जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त असून मूळचे भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते आहेत. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारे आणि कट्टर सावरकरवादी कार्यकर्ते म्हणजे दानवे. पण जागावाटपात विधानपरिषदेची जागा शिवसेनेला गेली. मग दानवेंना शिवसेनेत जावे लागले.ते आता पुन्हा येतील, अशी आशा करूया, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आबाचा दानवे यांचे जोरदार कौतुक केलं. माझ्याकडे कधीही कोणते पद न मागायला आलेला शिवसैनिक म्हणजे अंबादास दानवे असल्याचे ते म्हणाले. पावसाळा असल्याने कोणी कधी इकडे तिकडे उड्या मारू शकतो असं म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गटावरती जोरदार टीका केली.
फडणवीसांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो. मात्र त्यांनी माझ्याकडून घेतलेल्या नेत्यांबद्दल मुख्यमंत्री माझे आभार मानू शकतील की नाही?,याबद्दल शंका आहे. दानवे त्यांची टर्म पूर्ण करत आहेत. निवृत्त होत आहेत असं म्हणणार नाही. दानवे तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे मी पुन्हा येईन. काहीजण आज कौतुक करत असले तरी आंबादास यांना विरोधी पक्ष मिळते केल्यानंतर तेव्हा यांचे चेहरे कसे झाले माहित होते. ते भाजपच्या तालमीत तयार झालेल्या अंबादास तुम्ही दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभार मी मानतो. मात्र, तुम्ही माझे नेले त्यामुळे तुम्ही माझे आभार मानणार का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.
अंबादास यांनी भरल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही, असा टोलाही शिंदेना लगावला.
शिंदे- ठाकरे मध्ये शाब्दिकगुद्दे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. मात्र त्यांनी चांगले काम केले. गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे, असा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, काही लोक म्हणाले की ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत. मात्र काही लोक असे आहेत जे भरलेल्या ताटातून उधळून गेले आहेत. पद मिळाले नाही म्हणून दुसऱ्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. पण अंबादास यांनी भरल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही. मृणालताई गोरे या कधीही पदासाठी डगमगल्या नाहीत.
ठाकरेंचा शिंदेच्या शेजारी बसण्यास नकार
दानवे यांच्या निरोप समारंभ नंतर विधान भवनाच्या द्वारा समोर परिषदेतील सर्व सदस्यांचे फोटोसेशन करण्यात आले. यावेळी शिंदे यांच्या शेजारी उद्धव ठाकरे यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती.मात्र बसण्यास नकार दिला नीलम गोऱ्हे यांनी विनंती करूनही त्यांनी त्याला नकार दिला.त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये गोऱ्हे बसल्या. त्याचप्रमाणे फोटोसेशनसाठी येताना त्यांनी शिंदेकडे पाहण्याचे टाळले. तर शिंदे यांनी चष्मा पुसण्याच्या बाहण्याने त्यांच्याकडे पाठ फिरवली./