तभा फ्लॅश न्यूज: आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील १२४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी पार पडली. तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे आणि प्रभारी तहसीलदार अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, कुमारी प्रज्ञा प्रमोद कांबळे या शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते आरक्षणनिहाय चिठ्ठ्या काढून ही सोडत पार पाडण्यात आली.
सदर आरक्षणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गासाठी पदांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ५० टक्के सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
आरक्षणानुसार प्रमुख गावे:
🔹 अनुसूचित जाती (SC):
दानापूर, चिंचोली, कोठा कोळी, बरंजळा साबळे, धावडा, मलकापूर, वडोद तांगडा, कठोरा बाजार
🔹 अनुसूचित जाती – महिला:
खामखेडा, शिरसगाव, वालसा डावरगाव, पळसखेडा मुर्तड, बाभुळगाव, लिहा गारखेडा, सोयगाव देवी
🔹 अनुसूचित जमाती (ST):
मेहगाव, लिंगेवाडी, पोखरी
🔹 अनुसूचित जमाती – महिला:
दगडवाडी, सावंगी अवघडराव, पिंपळगाव थोटे
🔹 इतर मागासवर्गीय (OBC) – महिला:
कठोरा जैनपूर, नळणी बु., पळसखेडा पिंपळे, लोणगाव, तांदूळवाडी, केदारखेडा, हसबाद, पेरजापूर, सुरंगळी, टाकळी भोकरदन इत्यादी
🔹 इतर मागासवर्गीय (OBC):
पळसखेडा दाभाडी, राजूर, उमरखेडा, वडशेद, बोरगाव जहांगीर, मुठाड, गोकुळ, जळगाव सपकाळ, पिंपळगाव शेर इत्यादी
🔹 सर्वसाधारण – महिला:
चांदई टेपली, रेलगाव, कुंभारी, पिंपरी, मालखेडा, तपोवन, पद्मावती कोदोली, विझोरा, बेलोरा, फत्तेपूर जयदेववाडी इत्यादी
🔹 सर्वसाधारण:
कोठा जहागीर, निमगाव, खापरखेडा, गोदरी, करजगाव, मोहळाई, वाडी बुद्रुक, माळेगाव, सावखेडा, कोळेगाव, दहिगाव, वाकडी इत्यादी
उपस्थित अधिकारी व प्रक्रिया:
या सोडतीच्या वेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सदानंद नाईक, महसूल अधिकारी अमोल पाटील, निवडणूक विभागाचे पेशकार गणेश सपकाळ यांच्यासह निवडणूक विभाग व ग्रामपंचायतींचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.