तभा फ्लॅश न्यूज/सहयोग प्र.जावळे : रामपूरवाडी येथील २५ वर्षीय तरुणाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. मेहुन शिवारातील गट नं ३८ मध्ये असलेल्या शेतातील शेततळ्यात सतिश भानुदास जंजाळ वय २५ वर्ष रा.रामपूरवाडी याचा पाय घसरुन तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सतिश जंजाळ हा आपल्या शेतात दुपारी फेरफटका मारण्यासाठी गेला होता. फेरफटका मारत असताना तो शेतातील तळ्याजवळ गेला पण त्याचा पाय घसरल्याने तो तळ्यात पडला. बराच वेळ झाला तरी सतिश घरी परतला नव्हता त्यामुळे त्याचा भाऊ त्याला पाहण्यासाठी शेतात गेला असता त्याला सतिश शेततळ्यात पडलेला दिसला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने सतीशला पाण्याबाहेर काढून कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शेख यांनी तपासून मृत घोषित केले.
सतिश हा घरातील कर्ता असून उंबरखेड येथे मेडिकलचा व्यवसाय करत होता त्याच्या पश्चात आई-वडील,भाऊ असा परिवार आहे