तभा फ्लॅश न्यूज/ भोकरदन : ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत खरीप हंगामाचा प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश द्या आशा मागणी साठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वा खाली कास्तकरानी भोकरदन तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तहसीलदार अविनाश पाटील यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यां मार्फत खरीप हंगामाचा प्रतिवेदनात्मक आहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याचे पत्र आंदोलकांना दिल्यानंतर एक दिवसीय धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भाई जगदीश इंगळे,समाधान खेत्रे कानिफनाथ जाधव यांच्या सह दलीत आदिवासी, भूमिहीन बेघर ओबीसी, गरीब,मराठा कास्तकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.