तभा फ्लॅश न्यूज/ नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संविधानाच्या कलम 67(अ) अंतर्गत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, स्वतःच्या आरोग्याच्या समस्या व त्यावर उपचार सुरू असल्याचा उल्लेख करत राजीनाम्याची माहिती दिली.
मार्च महिन्यात त्यांना हृदयाशी संबंधित संसर्ग झाल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
https://twitter.com/ANI/status/1947325927953702996
राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
धनखड यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर, देशात नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.