तभा फ्लॅश न्यूज/परळी : शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस २२ जुलै निमित्त पशुसंवर्धन विभाग परळी वैजनाथ व राम रक्षा गोशाळा आयोजित गोपूजन, वंधत्व निवारण, जंतनाशन व गोचीड गोमाशी निर्मूलन शिबिर आयोजित करण्यात आले.
सदरील शिबिर अंतर्गत गोशाळेतील सर्व गो वर्गाचे जंतनाशक करण्यात आले, गोचीड गोमाशी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात आली. अनउत्पादित पशुधनाची व आजारी पशुधनाची तपासणी करून उपचार करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघुपशु सर्व चिकित्सालय परळी वैजनाथ यांच्यावतीने डॉ. एच. बी. पांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एल. आघाव, सुरज कोठारी, श्री श्यामसुंदर मंत्री, शिवप्रसाद शर्मा, रमन शर्मा , नवनाथ गीते ,ज्योतीराम मुंडे, श्रीकृष्ण फड ,श्री रामलिंग चलोदे, अजय पवार, गजानन मुंडे, नागेश स्वामी आदींनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात गोशाळेचे संस्थापक गोपालदास कोठारी म्हणाले की सध्याच्या दगदगीच्या युगामध्ये अनेक जण आजाराचे शिकार होत आहे. तेव्हा गोमातेच्या शेण पासून, गोमुत्रापासून अनेक आजारावर उपचार पद्धती सुरू असून त्यावर अनेक रामबाण औषधे तयार केले जातात त्याचा अनेक रुग्णांना फायदा होत आहे.
अनेक जण आजही गोशाळेत येऊन गोमातेच्या सानिध्यात राहून अनेक आजारांपासून मुक्ती पाऊ शकतो. तेव्हा गोशाळासारख्या सामाजिक उपक्रमातून आम्ही गोमातेच्या सेवे बरोबरच गोशाळेत अनेक सामाजिक उपक्रमही राबवत असतो असेही त्यांनी सांगितले.