तभा फ्लॅश न्यूज/बाळासाहेब गावडे : अंबड तालुक्यातील गोद्री पोलीस ठाणे गोंदी हद्दीतील मौजे डोणगाव शिवारात एन एच 52 हायवेवर पोउपनि हावले, पोहेकॉ रामदास केंद्रे असे पेट्रोलींग करीत असताना भारतबेंज कंपनीचा हायवा क्रमांक MH20GZ2545 चालक दुर्गासिंग काशिराम मरमट रा. परतूर हा विनापास परवाना हायवा मध्ये 5 ब्रास वाळू अंदाजे 30,000 रूचा वाहतूक करीत असताना मिळून आला त्याच्याकडे विचाररपूस करता वाहणाच्या मालकाच्या सांगण्यावरून तो वाहतूक करीत असल्याचे सांगीतले.
तसेच त्याच्या मदतीसाठी वशीम हासम पठाण रा. नवगाव ता. पैठण जि. छ. संभाजीनगर व एक अनोळखी व्यक्ती मदत करीत होते. त्यावरून वरील चारही इसमां विरूध्द पोलीस ठाणे गोंदी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण 45,35,000 रूपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे व दोन आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक, अजयकुमार बंसल साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, आयूष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, विशाल खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, आशिष खांडेकर, पोउपनि किरण हावले, पोहेकॉ रामदास केंद्रे सर्व पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हावले हे करीत आहेत.