तभा फ्लॅश न्यूज : हदगाव व हिमायतनगर तालुक्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच इसापुर धरणातून पैनगंगा नदीत वाढलेला विसर्ग यामुळे नाले-ओढे तुडुंब भरून वाहत असून शेतकरी बांधवांसह पूरग्रस्त नागरिकांचे हाल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्याकडे त्वरित मदत आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठकीत स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसील प्रशासन, पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण विभागासह इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















