मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगाम भैरवनाथ उद्योग समूहाचे नूतन चेअरमन अनिल सावंत यांच्या शुभ हस्ते व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.सुरवातीस काटा पूजन व सत्यनारायण पुज्या गोपाल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.आश्विनी यांचे शुभहस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे वेळी चेअरमन अनिल म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील ११ वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत.आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केलेले आहेत त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले.कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट दिलेले आहे ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन चेअरमन अनिलदादा सावंत यांनी यावेळी दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभरी,शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख रामचंद्र जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष
श्रीपती माने,भिमराव कांबळे,नामदेव ढगे,माणिक गुंगे,दत्तात्रय खडतरे,जमीर इनामदार,रामचंद्र जाधव,दादा पवार,आदित्य सावंत,अनुज सावंत,समीर जाधव,अरुण गायकवाड,संजय बेद्रे,युवराज शिंदे व जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे,मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण,शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे,चीफ अकौंटंट देवानंद पासले,एच आर मॅनेजर संजय राठोड, ई.डी.पी मॅनेजर गजानन माने-देशमुख, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, इलेक्ट्रिक इंजिनीअर संतोष माळी,स्टोअर किपर केदार साबणे,सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधिक्षक अभिजीत पवार यांच्यासह परिसरातील सरपंच,मान्यवर,पत्रकार बांधव व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.




















