सोलापूर : हटगार कोष्टी समाज ट्रस्ट, श्री चौडेश्वरी मंदीर ट्रस्ट व अक्कमदेवी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमानाने लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे 27 वा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
वाढत्या कौटुंबिक गरजा आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे एकमेकांना भेटण्याची संधी मिळत नसल्याने या मेळाव्याने एक महत्वाची व्यासपीठ उपलब्ध करून दिले, या मेळाव्यात अडीचशे हूनअधिक वधू वर आणि त्यांच्या पालकांनी भाग घेतला त्यामुळे अनेक नवीन नाती जुळण्याची शक्यता निर्माण झाली.
या मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर नंदकुमार वसवाडे (अध्यक्ष लिंगायत हटगार कोष्टी समाज महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर मेळाव्याचे संयोजक श्रीशैल काबने, सौ शितल वांढरे, सौ सुरेखा होळीकट्टी, स्नेहल निंबाळे श्री सचिन ढोपरे यांच्यासह मेळाव्याचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट लक्ष्मण मारडकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून आलेल्या 145 वर 100 वधुनी व्यासपीठावरून आपला परिचय दिला वधू- वर आणि पालकांनी एकमेकांशी संवाद साधून एकमेकांच्या अपेक्षा आणि गरजा समजून घेतल्या यातून अनेक स्थळे जुळण्यास मदत झाली.
यंदाच्या मेळाव्यात ट्रस्टच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला नोंदणी केलेल्या वधुनी व्यासपीठावर येऊन स्वतःचे परिचय करून दिल्यास त्यांनी नोंदणीसाठी दिलेली रक्कम भेट म्हणून त्यांना परत देण्यात येईल. यामुळे मुली मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला परिचय दिला.
मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सूत्रसंचालन सचिव परमेश्वर जवळकोटी सर यांनी केले.




















