अक्कलकोट – गेल्या दोन वर्षापासून अनेक साखर कारखानदारांनी उसाचे थकीत बिले अद्याप दिली दिले नाही. मात्र ओंकार साखर कारखानाने आजवर शेतकऱ्यांना योग्य भाव आणि वेळेत पेमेंट देण्याची परंपरा कायम ठेवल्याने शेतकऱ्यानी यंदाही मोठया प्रमाणात ओंकार कारखान्याला ऊस देणार असल्यांने यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केल्यांची माहिती ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिले.
ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि., युनिट-५ तडवळ येथे गळीत हंगाम २०२५-२६ चे बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन कार्यक्रम ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील
व संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचे स्वागत व आभारप्रदर्शन जनरल मॅनेजर व्हि.एम. गायकवाड यांनी केले. या प्रसंगी श्री. १०८ ष.ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूर, श्री. १०८ ष.ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, नावदगी, पानमंगरुळ, श्री. १०८ ष.ब्र. निळकंठ महास्वामीजी, हिरेमठ मैंदर्गी, श्री. १०८ ष.ब्र. गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी, हिरेमठ कल्लुहिप्पगे,श्री. १०८ ष.ब्र. विरशिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, हिरेमठ कडबगाव आदी उपस्थित होते.
यावेळी चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील पुढे म्हणाले की, ओंकार ग्रुपने आपल्या परंपरेप्रमाणे यंदाही दीपावली सणानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान राखत प्रत्येक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचा केला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. ओंकार ग्रुप सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. योग्य भाव, वेळेत पंधरवडी पेमेंट आणि साखर वाटपाची परंपरा कायम ठेवणे हे ओंकार ग्रुपचे वचन आहे.
यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने गाळप उद्दिष्ट १० लाख मेट्रिक टन निश्चित केले आहे. कारखाना अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असून, गाळप क्षमतेचा संपूर्ण वापर करून ऊस उत्पादकांना सर्वोत्तम परतावा मिळावा हा हेतुने सज्ज ठेवण्यात आला आहे. यासाठी सर्व विभागांनी नियोजनबब्द तयारी पूर्ण केली असून, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि कामगार सुरक्षा यावर विशेष भर दिला आहे. तरी शेतकरी, कामगार आणि कारखाना या तिन्ही घटकांच्या सहकार्यानेच ओंकार ग्रुप महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ग्रुप आहे.
बाबुराव बोत्रे-पाटील चेअरमन ओंकार ग्रुप
ओंकार पॉवर कॉर्पोरेशनच्या गळीत हंगामाप्रसंगी चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखा बोत्रे-पाटील व संचालक दिसत आहेत.
 
	    	 
                                




















 
                