पिलीव – माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी हे गाव दक्षिण भागातील माळशिरस तालुक्यातील शेवटचे गाव याठिकाणाहुन अनेक विद्यार्थी, अकलूज, पंढरपूर, म्हसवड व इतर ठिकाणी शाळा, काॅलेजला मोठ्या प्रमाणावर ये जा करतात .
शिंगोर्णी ह्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अकलूज आगाराची बस मुक्कामी असते.सकाळी सहाच्या दरम्यान ती बस शिंगोर्णी तुन ती बचेरी ,पिलीव, साळमुख, मळोली ,वेळापूर, खंडाळी मार्गे अकलूज ला जाते सकाळी लवकर एस टी बस जात असल्यामुळे अकलूज, पंढरपूर, भाळवणी,वेळापूर किंवा इतर ठिकाणी शाळा ,काॅलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होते.विद्यार्थी वेळेत पोहचतात माञ ही बस अकलूज आगार अनियमीतपणे सोडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.यामुळे शाळा ,कॉलेज बुडत आहे .
बस नियमीतपणे येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.याबाबत विद्यार्थ् व पालकांनी अकलूज आगाराकडे नियमीत बस सोडावी अशी मागणी करुनही अकलूज आगार दखल घेत नाही यामुळे सध्या विद्यार्थी ,पालकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष आहे.बस नियमीतपणे सुरू करण्याची मागणी होत आहे .
यांविषयी अकलूजचे आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला .माञ त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


















