पंढरपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित अंतरमहाविद्यालयीन विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी विद्यापीठाचे मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड व बालाजी पुलाचवाड यांनी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ला दिली. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. रमेश सिद यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत कर्मयोगीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये वैष्णवी खटावकर हिने प्रथम क्रमांक, तर आदित्य सदेवाले याने द्वितीय क्रमांक पटकावला. रायफल शूटिंगच्या दुसऱ्या प्रकारात वैष्णवी तांबोळी हिने प्रथम क्रमांक तर प्रतीक्षा कोपनर हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
या सर्व खेळाडूंना प्रा. गणेश बागल व प्रा.आकाश गुजरे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. या यशस्वी आयोजनामुळे कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे नाव क्रीडा क्षेत्रात आणखी उज्ज्वल झाले आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ.एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ.ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा.जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ.एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा.अनिल बाबर, प्रा.दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धा आर्यमान शूटिंग क्लब पिलीव येथे संपन्न झाल्या.


















