सोलापूर – कार्तिकी वारीसाठी सोलापूर शहरातून देगाव नाका येथील लक्ष्मी नगरातून एक व शेळगीच्या मनिषनगरमधून एक अशा दोन पायी दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
देगाव नाका येथील लक्ष्मी नगरातून रामकृष्णहरी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या दिंडीचे प्रस्थान अनंतमहाराज ढेरे यांच्या हस्ते वीणापूजनाने झाले. यावेळी हभप मनोज महाराज खलाटे, रामकृष्ण सुरवसे, संकेत सुरवसे, आदित्य ढेरे, बाळू शिंदे, प्रकाश सावंत, श्रेयस सुरवसे, चंदुलाल गोडसे, विणेकरी दादा खरात, दत्तात्रय गुंड, श्री.नवगीरे आदींसह वारकरी उपस्थित होते. हि दिंडी तिर्हेमार्गे पंढरपूरकडे जात आहे. यामध्ये वडजी, हगलूर, देवकुरळी, पाटील वस्ती, जुनी पोलीस लाईन येथील सुमारे शंभर वारकरी सहभागी झाले आहेत.
शेळगीच्या मनिषनगरमधून विठ्ठल-रूक्मीणी भजनी मंडळाच्या दिंडीचे विश्व वारकरी संघाचे शहराध्यक्ष हभप महेश महाराज जाधव यांच्या हस्ते वीणा पूजन होऊन प्रस्थान झाले. यावेळी अध्यक्ष हभप शिवाजी महाराज पोतदार, हभप अविनाश शिंदे, गणपत मानकुसकर, लक्ष्मिकांत वेदपाठक, नंदकुमार वेदपाठक, महेश महामुनी, मंगेश कळमणकर आदींसह वारकरी उपस्थित होते. दिंडीचे यंदा २८ वे.वर्ष आहे. हि पायी दिंडी मोहोळ मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे.
 
	    	 
                                



















 
                