जालना :  नरेंद्र जांगडे यांनी आपल्या पदाचा वापर करुन आणि सतीष कदम हे पोलीस ठाण्यात गेले नसतांनाही त्यांच्या नावे खोटी तक्रार दाखल केली आहे, नंदकिशोर जांगडे हे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर अध्यक्ष आहेत, असा आरोप तरुण नरेंद्रकुमार जांगडे आणि धणेश दिलीप चौधरी यांनी केला आहे.
या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात तरुण जांगडे आणि धणेश चौधरी यांनी म्हटले आहे की,  दि. 1 आक्टोबर 2025 रेाजी सतीश कदम हे कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये हजर नसतांनाही आपल्याविरोधात बोगस तक्रार केली आहे.
वास्तविक पाहता हा सारा खटाटोप माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे आणि त्यांचा मुलगा कपील जांगडे यांचा असून याप्रकरणास सर्वस्वी जबाबदार आहेत. म्हणूनच त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सुध्दा तरुण नरेंद्रकुमार जांगडे आणि धणेश दिलीप चौधरी यांनी केली आहेे.
या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही एक सविस्तर निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे आणि त्यांचा मुलगा कपील जांगडे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या विरोधात खोटी व बोगस स्वरुपाची तक्रार दिली आहे. 
वास्तविक सतीष कदम हे तेथे उपस्थित नसतांनाही राजकीय दबावाला पोलीस बळी पडले आणि नंदकिशोर जांगडे व कपील जांगडे यांनी दिलेली बोगस तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणात आम्हाला का गोवण्यात आले हेच समजत नाही. त्यांना करायचीच होती तक्रार तर स्वत:च्याच नावे करायची ना! पण याच्या- त्याच्या नावावर तक्रार देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सदर व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर नसतांंनाही पोलीस कशी काय तक्रार घेतात, हा मुळ प्रश्न असून त्याचे उत्तर आपल्याकडून हवे आहे. सदर घटनेची वरिष्ठ अधिकार्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही तरुण जांगडे व धनेश चौधरी यांनी केलीी असून त्यांनी उपोषण करण्याचा इशाराही पोलीस अधिक्षकांना दिला आहे.
 
	    	 
                                




















 
                