मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता निकाल हाती येण्यासाठी रात्री 10 वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या पसंतीच्या फेरीत 25 हजार 386 चा कोटा काढण्यात आला होता, मात्र एकही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण 20 हजार 78 मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार 489 मते पडली आहे. तर सूर्यकांत संग्राम यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या फेरीत 25 हजार 386 चा कोटा एकही उमेदवाराला मिळवता आला नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे.
अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री उशीर होणार
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजेपासून सुरवात झाली आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या इमारतीत ही मतमोजणी होत आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले असून, 700 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान, पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल हाती आला आहे. पण कोटा पूर्ण होऊ शकला नसल्याने आता दुसऱ्या क्रमाकांची मते मोजली जात आहे. त्यामुळे आता यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री उशीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पहिल्या पसंतीची आकडेवारी…
अ.क्र. | उमेदवाराचे नाव | मिळालेली मते |
1 | विक्रम काळे | 20078 |
2 | किरण पाटील | 13489 |
3 | कालिदास माने | 1043 |
4 | अनिकेत वाघचौरे | 22 |
5 | अश्विनीकुमार क्षीरसागर | 12 |
6 | आशिष देशमुख | 13 |
7 | कादरी शाहेद अब्दुल गफार | 197 |
8 | नितीन कुलकर्णी | 125 |
9 | प्रदीप साळुंके | 435 |
10 | मनोज पाटील | 1090 |
11 | विशाल नांदरकर | 28 |
12 | सूर्यकांत विश्वासराव | 13543 |
13 | संजय तायडे | 591 |
14 | ज्ञानोबा डुकरे | 105 |
एकूण मते | 50771 | |
बाद मते | 2485 | |
ग्राह्य मते | 53256 |