धाराशिव – “तरुण भारत” हे आपल्या राष्ट्रीयतावादी दृष्टिकोन विषयांवरील ठोस भूमिका, आणि सांस्कृतिक राष्ट्रवादासह भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारित विषयांवर परखडपणे लिखाण करत सामान्य माणसांच्या प्रश्नांना न्याय देणारे दैनिक आहे मत श्री तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजी बुवा यांनी जिल्हा आवृत्ती कार्यालय उदघाट्न प्रसंगी व्यक्त केले.

दैनिक सोलापूर तरुण भारत धाराशिव जिल्हा आवृत्ती नुतन कार्यालय आरंभ बुधवार 12 नोव्हेंबर रोजी तरुण भारत कुटुंब प्रमुख दिलीप पेठे, श्री तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजी बुवा, प्रकाशक दिलीप दुलंगे,जिल्हा संघचालक ऍड. रवींद्र कदम,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मराठवाडा आवृत्ती विभाग प्रमुख राजाराम मस्के,डॉ. सुश्रुत डंबळ,डॉ.सतीश महामुनी, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, बापू जगदे, अब्दुल सय्यद, बाळासाहेब शामराज, उमेश गवते, वितरण व्यवस्थापक नागसेन शिवशरण, जिल्हा प्रतिनिधी अनिल आगलावे, उपसंपादक विपीन वीर,तालुका प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

प्रखर राष्ट्रीय विचाराचे वृतपत्र म्हणून दै. सोलापूर तरुण भारत धाराशिव जिल्ह्यात गेल्या अनेक दशकापासून वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. धाराशिव नुतन कार्यालय शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.
























