अक्कलकोट – तालुक्यातील ग्रामपंचायत गुरववाडीच्या विद्यमान सरपंच सौ. लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरववाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार गुरववाडी ग्रामपंचायत प्रांगणात उत्साहात पार पडला.
या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी (सुक्षेत्र तुप्पीन मठ, नागणसूर-अक्कलकोट) श्री मडगोंडेश्वर महाराज सांगोगी बु.श्री यल्ललिंग महाराज अफजलपूर, ता.जळपूर, जि. कलबुर्गी धरेप्पा महाराज कडबगाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सरपंच सौ. लक्ष्मी पुजारी व म्हाळप्पा पुजारी यांनी गाव विकासाचा ध्यास घेत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून पाच वर्षांत तब्बल एक कोटी आठ लाखांची निधी मंजूर करून गावातील विकासकामे पूर्ण केली.गुरववाडीचे हे कामकाज आदर्श ठरत असून अक्कलकोट तालुक्यातील एकमेव ‘गाव विकास मॉडेल’ म्हणून गावाची ओळख निर्माण झाली आहे. या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर पुजारी दांपत्याचा हा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता .
यावेळी गावातील पूर्ण झालेल्या विकासकामांवर आधारित विशेष डॉक्युमेंटरी चित्रफित ग्रामस्थांना आणि मान्यवरांना दाखवण्यात आली.
या चित्रफितीचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या अमृत हस्ते सौ. लक्ष्मी पुजारी व म्हाळप्पा पुजारी यांना शाल–फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये रविकिरण स्वामी(माजी सरपंच व अध्यक्ष, तंटामुक्त समिती गुरववाडी, बसवराज देवरमनी,कल्याणी रावजी, राहुल पाटोळे,संगप्पा आलुरे,श्रीकांत गुरव, विजयकुमार बोरगाव,निंगप्पा पुजारी,सिद्धाराम पुजारी, श्रीमंत सावळी अर्जुन बहादुरे, शिवाजी रावजी, रमेश स्वामी, काशीराया रावजी, सदाशिव देवरमनी, राजाराम विजापुरे, बसवराज मोसलगी, निगप्पा मोसलगी, सायबणा हळखेड, श्रीमंत पुजारी, बेगेश मोती, कल्याणी साखरे, मायप्पा पुजारी, शिवानंद रावजी, श्रीशैल फुलारी, बसवराज बबलाद, शिवानंद मुंडेवाडी, कल्याणी गंगोंडा, नागणसूर व गुरववाडी जि.प. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, निगप्पा पुजारी, हणमंत पुजारी नाविंदगी, सुबणा टेलर आदीसह ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















