हिंगोली – औंढा नागनाथ तहसिल कार्यालयात भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. तहसीलदार हरिष गाडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मता शपथ वैजनाथ भालेराव यांनी दिली.
याप्रसंगी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव,ना तहसीलदार अनिता कोलगणे महसूल सहायक अधिकारी श्रीकृष्ण दराडे, भास्कर खंदारे,महसूल सहायक वहिद पठाण, शेख हमीद, मल्हारी क्षीरसागर, शेख सलीम, आनंद दातार,उंकडी मारकड, नितीश कुलकर्णी, मारोती सोनटक्के, पुरवठा सहायक कल्याणी हटवार,डोरे, सहशिक्षक उमाकांत मुळे, शिपाई नामदेव घोणे, शिपाई कैलास जाधव, विनोद साळवे ई.उपस्थित होते.



















