नांदेड – अवैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्या दोन महाकाय बोटी एका कंटेनर मधून गोदाकाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी चंदासिंघ कॉर्नर येथे जाऊन कंटेनर व त्यावर असलेल्या दोन महाकाय बोटी असा एकूण ८५ लाखाचा मुद्देमाल नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी जप्त केले.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणारी वाळूची तस्करी थांबवण्यासाठी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी कडक कारेवाही करत वाळू उपसा करणाऱ्यावर जप्ती करण्यात येत आहे. पोलीस ठाणे हद्दीतील सर्व वाळू घाटावर स्वतः जाऊन धाडी टाकून वाळू माफिया वर कारेवाही केली जाते.
यातच दिनांक १७ नोव्हेंबर रोजी वाळू माफिया कडून गोदावरी पात्रातील वाळू उपसण्यासाठी मोठ्या दोन महाकाय बोटी घेऊन जात असलेला कंटेनर क्रमांक एम एच ५३ बी– ०३०३ यास अडून विचारपूस केली असता कंटेनन्सचे चालक उडवा उडवी चे उत्तर देत असल्याने त्या ताब्यात घेऊन सखोल तपासणी केल्यास सदरील बोटी वाळू उपसासाठी नेत असल्याचे सांगितले तेव्हा दोन बोटी व कंटेनर असा एकूण ८५ लाखाचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला.
या कारेवाहीमुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण ठाण्याचे पो.नि. ओमकांत चिचोलकर यांच्यासह पोहेकॉ. शेख इब्राहिम, पोहेकॉ. भोसले, माने, मारवाडे यांचे कौतुक केले.



















