धाराशिव – श्री क्षेत्र वाशी जिल्हा धाराशिव येथे पारंपारिक श्री सदगुरू कै.ह.भ.प. तात्यासाहेब वासकर महाराज, तसेच सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडी व वै.ह.भ.प. साताप्पा महाराज थोबडे यांच्या कृपाशीर्वादाने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञान यज्ञ सोहळा मार्गशीर्ष शु १ शुक्रवार दि.२१-११-२०२५ ते मार्गशीर्ष शु ८ शुक्रवार दि.२८-११-२०२५ पर्यंत आयोजित केला आहे.
दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती सकाळी ७:३० ते ९:३० पारायण १० ते ११:३० ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १ भोजन २ ते ४ गाथा भजन सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ रात्री ९ ते ११ किर्तन व रात्री १२ ते ४ हरी जागर याप्रमाणे दररोज कार्यक्रम होणार आहे.
ह.भ.प. गोविंद महाराज मुंडे परळी वैजिनाथ ह.भ.प. गुरुवर्य गोपाळ अण्णा वास्कर वाशी हे.भ.प. कृष्णनाथ महाराज कुंभार शिराळा हे.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा हे.भ.प. वेदांताचार्य नवनाथ महाराज राऊत निमगाव ह.भ.प. कबीर महाराज आत्तार व्याख्याते हे.भ.प. कृष्णा महाराज पोद्दार पंढरपूर यांचे कीर्तन व ह.भ.प. चिंतामणी महाराज घोडके पंढरपूर यांचे सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन व ह.भ.प. गुरुवर्य नामदेव महाराज वासकर यांचा काला अभंग व काला वाटप व त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
सप्ताहामध्ये वाशी,सारोळा वाशी, सोनेगाव, कनेरी, कवडेवाडी, केळेवाडी, गोलेगाव, पारडी, शेंडी, तांदुळवाडी जवळकाव, गोजवडा, लाखनगाव, इंदापूर, इसरूप खानापूर, बावी, धामणगाव, कडकनाथ वाडी या गावाचा हरी जागर होणार असून दररोज अन्नदाते म्हणून संतोष ढवळे, पद्मराज गपाट, देविदास मस्कर, भाऊसाहेब जगताप, शहाजी कागदे, दत्तात्रेय कागदे, राजेंद्र साळुंके, मच्छिंद्र माने, शैलेश साळुंके, विठ्ठल साळुंके, भारत कवडे, श्रीधर पवार, ऍड कोठावळे, डॉ. दत्तात्रेय कवडे, किशोर माने, यांच्यावतीने अन्नदान होणार आहे. तसेच पांडुरंग शिंदे, बागवान पुणेकर, बाबासाहेब पवार, रामेश्वर लगास, विठ्ठल भाळवणे, अण्णासाहेब घुले, किसनराव कवडे, हे अल्पपार देणार आहेत. आज शुक्रवार दि.२१ रोजी दुपारी ४ वाजता ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या सप्ताह मध्ये सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी वाशी हे कळतात वरील सर्व कार्यक्रम वाशी येथे काळा मारुती मंदिर तहसील रोड येथे भव्य प्रमाणात होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.


















