पंढरपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन, बुद्धीबळ व ज्युडो या क्रीडाप्रकारा मध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश संपादित करून आपली यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी व ऑर्चिड कॉलेज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्यूडो क्रीडा प्रकारामध्ये करण माने या विद्यार्थ्याने सुवर्णपदक तर सोहम पवार याने कांस्य पदक पटकाविले. तसेच पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारामध्ये स्वप्नील देशमाने या विद्यार्थ्याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. यापैकी करण माने या विद्यार्थ्याची भोपाळ येथे होणार्या् आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. तसेच सोलापूर विभागांतर्गत झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कर्मयोगीच्या अच्युत भाले, विशाल गुंड, वासुदेव कवडे, प्रतीक सुतार, अभिजीत शिंदे विद्यार्थ्यानी प्रभावी कामगिरी सादर करून यश संपादीत केले. सोलापूर विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कर्मयोगीच्या विद्यार्थ्यानी रोमहर्षक सामन्यात उपविजेतेपद पटकाविले. यामध्ये गौरव दळवे, प्रेम शिंदे, ओंकार जाधव, रामरतन जाधव, वेदान्त देशमुख इत्यादि खेळाडूंचा समावेश होता.
कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील शिक्षणा बरोबरच शारीरिक शिक्षणाचे ही प्रशिक्षण दिले जाते व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून घेण्यात येणार्याे विविध क्रीडास्पर्धेत मध्ये मिळालेल्या यशातून दिसून येत आहे याचे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. वरील सर्व क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.गणेश बागल यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी.कणसे, रजीस्ट्रार जी.डी.वाळके, उपप्राचार्य प्रा.जे.एल.मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ.सोमनाथ लंबे, डॉ.अनिल बाबर, डॉ.एस.व्ही. एकलारकर, प्रा.दीपक भोसले, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



















