सोलापूर – अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे स्मरणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक अनंत सुरते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, त्याची उद्दिष्टे तसेच भारतीय लोकशाहीची पायाभूत तत्त्वे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांची आणि कर्तव्यांची थोर परंपरा विद्यार्थ्यांसमोर प्रभावी शब्दांत मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य इस्माईल शेख, इस्माईल उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका मेहजबीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संविधान जागरूकतेची गरज अधोरेखित करत विद्यार्थी वर्गाने लोकशाही मूल्यांचा आदर राखत कर्तव्यपरायण नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्चना दीक्षित यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.धनाजी धेंडे यांनी केले.
26/11 च्या धक्कादायक हल्ल्यात प्राणार्पण केलेल्या शहीदांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळण्यात आले. शाळेत संविधान प्रस्तावना समूह वाचनही घेण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान दिनाचे औचित्य साधत देशभक्ती आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
फोटो : संविधान दिनाच्या औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य इस्माईल शेख,मुख्याध्यापिका मेहजबीन शेख,अल्पना जाधव इत्यादी मान्यवर.



















