अक्कलकोट – अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदासाठीच्या २५ जागांपैकी अकरा जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षण असून ४० महिला उमेदवार हे निवडणुकीत नशीब आजमावित आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात असून यामध्ये एकही महिला उमेदवाराचा समावेश नाही.
अक्कलकोट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण बारा प्रभाग असून नगरसेवक पदाच्या २५ जागा आहेत. यातील ११ जागा या ओबीसी , एससी , खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. नगरसेवक पदासाठी एकूण ७६ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा जण हे निवडणूक लढवत आहेत. विविध प्रभागातील ११ जागांसाठी विविध पक्षांकडून ४० महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे मिलन कल्याणशेट्टी , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून अशपाक बळोर्गी, शिवसेना शिंदे गटातर्फे रईस टिनवाला , शिवसेना ठाकरे गटातर्फे बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शरद पवार गटातर्फे इक्रार शेख, अपक्ष म्हणून नागनाथ उमदी हे निवडणुकीच्या मैदानात आहे.
अक्कलकोट नगरपरिषद प्रभाग क्रमांक एक अ सुनंदा स्वामी (भारतीय जनता पार्टी ) कौसर नदाफ ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) राजश्री बोलदे ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक एक ब भीमराव शेळके (भारतीय जनता पार्टी ) गुरुपादप्पा गुब्याड ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) राहुल चव्हाण (शिवसेना शिंदे गट ) सिकंदर चाऊस (अपक्ष ) प्रभाग क्रमांक दोन अ कस्तुरा चौगुले (भारतीय जनता पार्टी ) विजयालक्ष्मी आळवीकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) शकुंतला चौगुले ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक दोन ब लक्ष्मीकांत धनशेट्टी (भारतीय जनता पार्टी ) श्रीशैल गंगनगोंडा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )मंगेश जाधव ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक तीन अ मुस्तफा गवंडी ( भारतीय जनता पार्टी )मुस्तफा बळोरगी ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) प्रभाग क्रमांक तीन ब रेश्मा शेख (भारतीय जनता पार्टी )जाहिराबी शेख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) पुतळाबाई शिरसागर (शिवसेना शिंदे गट )प्रभाग क्रमांक चार अ अविनाश मडीखांबे ( भारतीय जनता पार्टी ) राहुल मोरे ( शिवसेना शिंदे गट ) नागेश हरवाळकर (अपक्ष) प्रभाग क्रमांक चार ब मंजना कामनूरकर (भारतीय जनता पार्टी ) रखमाबाई शापवाले ( शिवसेना शिंदे गट ) विद्या माळी ( अपक्ष ) प्रभाग क्रमांक पाच अ रेणुका राठोड ( भारतीय जनता पार्टी )सुस्मिता अळोळी ( शिवसेना शिंदे गट )नसरीन बागवान (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )प्रभाग क्रमांक पाच ब रमेश कापसे ( भारतीय जनता पार्टी ) सय्यद मुजम्मिल पाशा पिरजादे ( शिवसेना शिंदे गट )सौरभ लांडगे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ) सैपन शेख (एम आय एम )प्रभाग क्रमांक सहा अ अपर्णा शिंदे (भारतीय जनता पार्टी )जयश्री फुलारी ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) गंगाबाई इसापुरे (शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक सहा ब यशवंत धोंगडे ( भारतीय जनता पार्टी )सिद्धाराम आळगी (शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक सात अ नवीद डांगे ( भारतीय जनता पार्टी ) रजाक बागवान ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) नुरूद्दीन बागवान (शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक सात ब अमृता शिंदे (भारतीय जनता पार्टी ) मीनाक्षी सूर्यवंशी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) फरियाशाजनीन टिनवाला ( शिवसेना शिंदे गट )जन्नतबी बागवान (अपक्ष ) प्रभाग क्रमांक आठ अ शैला स्वामी (भारतीय जनता पार्टी ) शोभा इचगे ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक आठ ब महेश हिंडोळे (भारतीय जनता पार्टी ) आकाश शिंदे (शिवसेना शिंदे गट ) रवींद्र डोके ( शिवसेना ठाकरे गट ) प्रभाग क्रमांक ९ अ स्नेहा खवळे (भारतीय जनता पार्टी ) आरती पारखे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) पुतळाबाई शिरसागर ( शिवसेना शिंदे गट ) नाजीन होटकर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) संजाबाई ठोंबरे (वंचित बहुजन आघाडी ) प्रभाग क्रमांक ९ ब सद्दाम हुसेन शेरीकर (भारतीय जनता पार्टी )शकील खिस्तके ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )राहुल भकरे (शिवसेना शिंदे गट )देवेंद्र शिंदे (शिवसेना ठाकरे गट ) प्रभाग क्रमांक दहा अ सोनाली शिंदे ( भारतीय जनता पार्टी ) हर्षदा पाटील ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक दहा ब देविदास कवटगी (भारतीय जनता पार्टी ) सिद्धलिंग लाळशेरी ( शिवसेना शिंदे गट ) अक्षय सोमवंशी ( अपक्ष ) प्रभाग क्रमांक ११ अ आरती गायकवाड ( भारतीय जनता पार्टी ) सरिता कुरले ( शिवसेना शिंदे गट ) प्रियांका मडीखांबे (वंचित बहुजन आघाडी ) प्रभाग क्रमांक ११ ब महेश इंगळे (भारतीय जनता पार्टी ) मुबारक कोरबू ( शिवसेना शिंदे गट ) किरण किरात ( शिवसेना ठाकरे गट ) प्रभाग क्रमांक १२ अ ऋतुराज राठोड ( भारतीय जनता पार्टी )अशितोष राठोड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) प्रभाग क्रमांक १२ ब भागुबाई कुंभार ( भारतीय जनता पार्टी )कमलाबाई राठोड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) ताराबाई कुंभार ( शिवसेना शिंदे गट ) प्रभाग क्रमांक बारा क अल्फिया कोरबू ( भारतीय जनता पार्टी ) सायराबानू कोरबू ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) रवीना राठोड ( शिवसेना शिंदे गट )
अक्कलकोट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत आहे. तर २५ नगरसेवक पदांसाठी विविध ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा आता नागरिकात चांगलीच रंगली असून विविध पक्षाच्या उमेदवाराने प्रचारासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.



















