सोलापूर – सोलापूर शहरात पवन कल्याण यांच्या कार्य, विचार आणि जनसेना तत्त्वज्ञानावर प्रेरित होऊन स्थापन झालेल्या पवन कल्याण फॅन्स असोसिएशन ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सामाजिक उपक्रम, मदतकार्य, रक्तदान, जनजागृती मोहिमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या या संघटनेची २०२५-२६ या वर्षासाठीची नवीन पदाधिकारी निवड नुकतीच पार पडली.
दत्तनगर दत्त मंदिराशेजारील गाळा क्रमांक २ मधील जनसेना संपर्क कार्यालयात हा बैठक संपन्न झाला. पवन कल्याण फॅन्स असोसिएशन संस्थापक श्रीनिवास यन्नम (कामटे) यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या आगामी कामासाठी उत्साह व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणी २०२५-२६ अध्यक्ष दुर्गाप्रसाद वंगारी, उपाध्यक्ष अनिल कोंडा, सचिव श्रीनिवास बिटला, सहसचिव व्यंकटेश पासकंटी, खजिनदार आनंद अवधूत, सदस्य रघु शासम, श्रीनिवास कनकी, श्रीनिवास गुंडेटी, गणेश भंडारी, गणेश पोतन, प्रसिद्धी प्रमुख रोहन श्रीराम यांचे निवड करण्यात आले.
या निवडीनंतर बोलताना संस्थापक श्रीनिवास यन्नम यांनी सांगितले की, ”पवन कल्याण यांच्या आदर्शांवर आधारित सामाजिक कामाला अधिक गती देणे हा नवीन कार्यकारिणीचा मुख्य उद्देश असेल. सोलापूर शहरात युवा पिढीपर्यंत जनसेना विचार पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील.”
नवीन पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक सामाजिक उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. विशेषत: युवकांसाठी मार्गदर्शन, रक्तदान मोहिमा, पर्यावरण संवर्धन, मदतकार्य तसेच पवन कल्याण यांच्या समाजोपयोगी कार्याचा प्रचारझ्रप्रसार अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी संघटनेला नवी उमेद आणि ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
























