फर्दापूर / संभाजीनगर – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे प्रसिद्ध छायाचित्रकार रॉबर्ट गिल यांचे पणतू आणि सुन यांनी लेणी आनंद व्यक्त केला जगप्रसिद्ध अजिंठा लेणी चे भिंत चित्र, छायाचित्रकार, फोटोग्राफर रॉबर्ट गिल यांचे पणतू डॉक्टर केनेथ डुकाटेल व त्यांची पत्नी कँथरीना सुयकेन्स यांनी त्यांची हुनिमून पहिली ट्रिप जगप्रसिद्ध अजिंठा लेणी हि निवडली कारण की आम्हीला माझे आजोबा रॉबर्ट गिल हे त्या काळात येथे कोणत्या परिस्थितीत वास्तव्यात राहत असतील आम्हाला याची फार उत्सुकता वाटत होती त्यामुळे आम्ही भारतातही ट्रीप पक्की केली आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी अगदी मनसोक्त निहाळून बघितली आणि येथील भिंती चित्र मूर्ती काम नक्षीकाम खूप सुंदर असून भारत सरकारने चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहे त्यामुळे आम्हाला त्याचे खूप कौतुक वाटत आहे.
यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी मनोज मीराबाई प्रकाश पवार यांनी त्यांचे लेणीत प्रथम स्वागत करण्यात आले त्यांच्या सोबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील गाईड भारत जोशी होते
























